ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
माहिती
चिंचवड हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वसलेले एक प्रगतशील व शेतीप्रधान गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची एकूण लोकसंख्या ४६३१ आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती, दुग्धव्यवसाय, शेतमजुरी आणि लघुउद्योग हे आहेत. पाण्याचे मुख्य स्रोत विहिरी, नळयोजना आणि बोअरवेल आहेत.
गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा मोठ्या प्रमाणावर जपला गेला आहे. येथे श्री शंकर महाराज मंदिर, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, आणि हनुमान मंदिर (हुनुमंतवाडी) यांसारखी प्रसिद्ध मंदिरे आहेत. गावात गणेशोत्सव, शिवजयंती, दिवाळी, पोळा, होळी, रामनवमी आणि आषाढी एकादशी हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
चिंचवड गावात स्वच्छतेला आणि पर्यावरण संरक्षणाला विशेष महत्त्व दिले जाते. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वृक्षारोपण, जलसंधारण, आणि स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रातही गाव प्रगत असून प्रत्येक मुलाला शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात.
सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हे गाव एकोपा, सहकार्य आणि परंपरेचा वारसा टिकवून ठेवणारे आहे. कीर्तन, भजन, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सामाजिक उपक्रमांमध्ये गावकरी उत्साहाने सहभागी होतात. चिंचवड हे गाव आजही समृद्ध शेती, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार चिंचावड लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| अ.क्र. | तपशील | एकूण | पुरुष | स्त्री |
|---|---|---|---|---|
| १ | एकूण लोकसंख्या | ४६३१ | २३६५ | २२६६ |
| २ | बाल लोकसंख्या (०–६ वर्षे) | ४३२ | २२० | २१२ |
| ३ | अनुसूचित जाती (SC) | ३२५ | १६५ | १६० |
| ४ | अनुसूचित जमाती (ST) | ३८४५ | १९५२ | १८९३ |
| ५ | साक्षर लोकसंख्या | ३०५८ | १७२४ | १३३४ |
| ६ | निरक्षर लोकसंख्या | १५७३ | ६४१ | ९३२ |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |